03 August 2020

News Flash

Video : सुपर स्विंग! असा त्रिफळाचीत कधी पाहिलाय का?

बाद झाल्यावर फलंदाजही थक्क होऊन स्टंपकडे पाहू लागला..

Women’s National Cricket League या स्पर्धेत एक आश्चर्यकारक घटना घडल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाची वेगवान स्विंग गोलंदाज मेगन शट हिने एका सामन्यात अफलातून त्रिफळाचीत बळी मिळवला. सोमवारी साऊथ ऑस्ट्रेलिया स्कॉर्पियन्स आणि क्विन्सलँड फायर या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची गुणवान स्विंग गोलंदाज मेगन शट हिने एक त्रिफळाचीत काढून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मेगन शटने क्विन्सलँड फायर संघाच्या एका महिला फलंदाजाला अफलातून पद्धतीने बाद केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

मेगन शटने एका इनस्विंग चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला त्रिफळाचीत केले. मेगन शटने चेंडू टाकला. तो चेंडू इन स्विंग होणार हे कळत होते. पण चेंडू कितपत आत स्विंग होईल याचा अंदाज फलंदाजाला आला नाही. त्या महिला फलंदाजाने चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला. पण तो चेंडू स्विंग झाला आणि फलंदाज थेट त्रिफळाचीत झाली.

आपण त्रिफळाचीत झालो आहोत हे आधी फलंदाजाला समजलेच नाही. ज्यावेळी त्या फलंदाजाने मागे पाहिले, तेव्हा त्रिफळा उडाल्याचे त्या महिला फलंदाजाला समजले. आपण त्रिफळाचीत झालो आहोत हे समजल्यानंतर स्वत: महिला फलंदाजही थक्क झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 5:17 pm

Web Title: video megan schutt in swinger bowl batsman clean bowled vjb 91
Next Stories
1 ….तर विश्वचषकात उपांत्य सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता !
2 अनिल कुंबळेला निवड समितीचा अध्यक्ष बनवा – विरेंद्र सेहवाग
3 भारतीय संघ कोणाचीही खासगी मालमत्ता नाही, धोनीच्या निवृत्तीबद्दल भारतीय क्रिकेटपटूचे खडे बोल
Just Now!
X