News Flash

धोनीच्या झिवाला मिळाली पहिली जाहिरात; तुम्ही पाहिलात का VIDEO?

धोनीसह जाहिरातीत झळकली लेक झिवा

क्रिकेटच्या दुनियेत महेंद्रसिंह धोनीपेक्षा जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेले फारसे खेळाडू नाहीत. धोनीने २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. पण तरीदेखील त्याचा जाहिरातविश्वातील दबदबा कमी झालेला नाही. त्यातच आता एका प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीसाठी धोनीसह त्याची लेक झिवा हिलाही अभिनयाची संधी मिळाली आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच झिवाला आपली पहिली जाहिरात मिळाली आहे. एका ख्यातनाम अशा उत्पादनाच्या जाहिरातीत बाबा धोनी आणि लेक झिवा हे दोघेही दिसत आहेत.

झिवा अवघ्या पाच वर्षांची आहे. पण झिवाचा फार मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर झिवाचे एक अकाऊंट आहे. या सोशल मीडियावर साईटवर १.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिच्या अकाऊंटवरून तिचे स्वत:चे आणि धोनी-साक्षीसोबतचे फोटो पोस्ट केले जातात. या फोटो आणि व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असतात. नव्या वर्षात झिवा पुढचं पाऊल टाकत एका प्रसिद्ध उत्पादनाच्या जाहिरातीत झळकली आहे. ओरियो या चॉकलेट क्रिम बिस्कीटच्या जाहिरातीत धोनी आणि झिवा मस्ती करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Oreo (@oreo.india)

दरम्यान, ‘सेलेब्रिटीनेटवर्थ’च्या माहितीनुसार सध्या धोनीचे मूल्य १७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके आहे. धोनी सध्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग नसला तरी IPLमध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळताना तो एका हंगामाचे १५ कोटी रूपये कमावतो. गेल्या काही महिन्यांत धोनीने शेती करण्यास सुरूवात केल्याचे सांगण्यात येत आहे. धोनीची ही नवी इनिंग्स कशी असेल याकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 9:28 am

Web Title: video ms dhoni daughter ziva gets first brand advertisement at age of 5 features alongside msd in oreo ad vjb 91
Next Stories
1 ब्रिस्बेन कसोटीस भारताचा पाठिंबा!
2 रोनाल्डोकडून पेले यांचा विक्रम मोडित
3 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी!
Just Now!
X