News Flash

VIDEO : जेव्हा सूर्यकुमार ड्रोनसोबत खेळतो पकडा-पकडी!

मुंबई इंडियन्सने शेअर केला व्हिडिओ

sky
सूर्यकुमार यादव

आयपीएलचा चौदावा हंगाम करोनाच्या प्रकरणांमुळे स्थगित करण्यात आला. त्यामुळे आता लीगमधील उर्वरित सामने टी-२० वर्ल्डकपनंतर खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. बायो बबलमध्ये असताना लीगमधील अनेक संघ विविध उपक्रम करण्यात गुंतले होते. संघातील खेळाडूंचे अनेक मजेशीर व्हिडिओसुद्धा समोर येत होते. मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमारचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओत सूर्यकुमार ड्रोनशी पकडापकडी खेळताना दिसत आहे. एका मैदानात हा ड्रोन सूर्यकुमारचा पाठलाग करतो, यात सूर्यकुमारही त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. टीम इंडियात दमदार पदार्पण केलेल्या सूर्यकुमारला आयपीएलचा स्थगित झालेला हंगाम तितका चांगला गेला नाही.

 

मुंबईने खेळल्या गेलेल्या ७ सामन्यात २४.७१च्या सरासरीने आणि १४४.१६च्या स्ट्राईक रेटने १७३ धावा केल्या. यात त्याने ५६ धावांची केलेली खेळी ही सर्वोत्तम होती. या सामन्यांत त्याने २२ चौकार आणि ५ षटकार लगावले.

मुंबईने ७ सामन्यात ४ विजयांसह गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. लीगमध्ये त्यांना ३ पराभव पत्करावे लागले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने १२ गुणांसह पहिले, तर चेन्नईने १० गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 2:30 pm

Web Title: video mumbai indians suryakumar yadav playing pakda pakdi with drone during ipl 2021 adn 96
Next Stories
1 IPL २०२१ : बालाजीसोबत बसल्यामुळे मायकेल हसीला करोनाची लागण?
2 KKRच्या यष्टीरक्षक-फलंदाजाला झाला करोना
3 “भारतात IPL भरवण्यात आम्ही कोणतीही चूक केलेली नाही”, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं टीकाकारांना उत्तर!
Just Now!
X