भारताविरुद्ध दोन कसोटी, पाच वन डे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी विंडीजचा संघ भारतात दाखल झाला. राजकोट येथे विंडीजच्या खेळाडूंचे ढोलताशाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

India’s vibrant culture greets us upon arrival!! #windiescricket #india #cricket #itsourgame #

A post shared by WINDIES Cricket (@windiescricket) on

जेसन होल्डर याच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडिजचा संघ खेळणार आहे. नुकतीच झालेली श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका विंडीजने १-१ अशी बरोबरीत सोडवली. त्यामुळे भारतीय संघाविरुद्ध खेळताना त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

भारत आणि विंडीज यांच्यातील मालिकेला ४ ऑक्टोबरपासून कसोटी सामन्याने सुरुवात होणार आहे. हा सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. म्हणून विंडीजचा संघ गुरुवारी येथे दाखल झाला.वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात १९४८ ते आत्तापर्यंत ९४ कसोटी सामने झाले आहेत. वेस्ट इंडिजने त्यापैकी ३० कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे, तर ४६ सामने अनिर्णीत राखले आहेत. तर २८ सामन्यांत भारताने बाजी मारली आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी वेस्ट इंडिजचा संघ बोर्ड एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

वेस्ट इंडिज संघ – जेसन होल्डर ( कर्णधार), सुनील अॅब्रीस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शेन डोवरीच, शॅनोन गॅब्रीयल, जॅह्मर हॅमिल्टन, शिम्रोन हेटमेर, शाय होप, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, कायरेन पॉवेल, केमार रोच, जोमेल वॅरिकॅन.