News Flash

Video : पाहा द्रविडने टिपलेले अफलातून झेल

हरभजनने पोस्ट केला खास व्हिडीओ

राहुल द्रविड हा त्याच्या कारकिर्दीतील एक सर्वोत्कृष्ट फलंदाज तर होताच, पण त्याच बरोबर तो भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक उत्तम फिल्डरही होता. फलंदाजाच्या जवळच्या क्षेत्रात फिल्डींग करण्यात त्याचा हातखंडा होता. स्लिपपासून ते शॉर्ट-लेग आणि सिली पॉइंटपर्यंत सगळ्या ठिकाणी द्रविडचा दबदबा होता. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक अशी राहुल द्रविडची ख्याती होती. द्रविडने फलंदाजाच्या नजीक फिल्डींग करत अनेक नेत्रदीपक झेल टिपले. द्रविडच्या याच अफलातून झेलांचा एक व्हिडीओ फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने पोस्ट केला आहे.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने आयुष्यभर द वॉल हे बिरुद मिरवलं. आपली तंत्रशुद्ध फलंदाजी आणि भक्कम बचाव यासाठी राहुल द्रविड ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर राहुलने भारताच्या १९ वर्षाखालील संघाचं प्रशिक्षकपदही भूषवलं. सध्या तो बंगळुरुस्थित (NCA) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुलने केलेल्या कामगिरीबद्दल त्याला कधीही पुरेसं श्रेय मिळत नाही अशी अनेकदा चर्चा रंगत असते. मात्र Wisden India ने सोशल मीडियावर घेतलेल्या पोलमध्ये राहुल द्रविड गेल्या ५० वर्षातला भारताचा सर्वोत्तम कसोटीपटू ठरला आहे. Wisden India च्या सोशल मीडिया पेजवर घेण्यात आलेल्या या पोलमध्ये ११ हजार पेक्षा जास्त लोकांनी आपली मतं नोंदवली. यात ५२ टक्के लोकांनी राहुलच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तर ४८ टक्के लोकं ही सचिनच्या बाजूने होती.

१६ भारतीय खेळाडूंनिशी Wisden India ने हा पोल सुरु केला होता. ज्यात राहुल आणि सचिनसह विराट, सुनिल गावसकर अशा दिग्गज खेळाडूंचा सहभाग होता. गावसकर यांनी या पोलमध्ये विराटवर मात करत तिसरं स्थान पटकावलं आहे. आपल्या कारकिर्दीत राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करायचा त्याचप्रमाणे राहुलने या पोलमध्येही अखेरपर्यंत लढा देत बाजी मारल्याचं Wisden India ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 1:57 pm

Web Title: video of rahul dravid classic catches shared by harbhajan singh watch vjb 91
Next Stories
1 भविष्यात कर्णधारपदासाठी रोहित शर्मा सर्वोत्तम पर्याय – आकाश चोप्रा
2 सचिनला शून्यावर बाद केल्याचा आनंद शब्दात सांगणं अशक्य – भारतीय गोलंदाज
3 धोनीची हीच खेळी पाकिस्तानला आजही वाटते संशयास्पद
Just Now!
X