18 January 2021

News Flash

Video : रोहित-रितिकाच्या चिमुकलीचं Cute Smile

या व्हिडिओमध्ये समायरा गोड स्मितहास्य करताना दिसत आहे...

टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध टी २० मालिकेत हार पत्करावी लागली. २-१ अशी भारताने ती मालिका गमावली. त्यामुळे कर्णधारपदाची भूमिका पार पाडणारा रोहित शर्मा काहीसा हताश झाला होता. पण भारतात परतल्यावर त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य परतले. त्याचं महत्वाचं कारण रोहित शर्माला अखेरीस आपली चिमुकली समायरा हिला वेळ देता आला.

आधी ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यामुळे रोहितला आपल्या चिमुकलीला मनसोक्त खेळता आले नव्हते. रोहितची पत्नी रितिकाने समायराला जन्म दिल्यानंतर रोहित काही दिवसांसाठी आपल्या पत्नी आणि चिमुकलीला भेटायला गेला होता. त्यानंतर त्याला पुन्हा मैदानावर परतावे लागले होते. मात्र आता रितिकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh) on

या बरोरबच रोहितच्या एका चाहतीनेदेखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. रोहित आपली चिमुकली समायरा हिच्याशी खेळत असल्याचे या व्हिडीओमध्ये कॅप्शन देण्यात आले आहे. त्यात रोहित शर्मा आणि रितिका हिलादेखील टॅग केले आहे.

दरम्यान, न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेतील अखेरचे दोन सामने व टी २० मालिका खेळला. त्यातील १ एकदिवसीय सामना भारताने जिंकला. तर टी २० मालिका भारताने २-१ अशी गमावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 3:21 pm

Web Title: video rohit sharma daughter samaira cute smile
Next Stories
1 ‘मुंबई रणजी क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेत अनियमितता’
2 क्रिकेट संघात निवडलं नाही म्हणून प्रशिक्षकावर हल्ला करणारा अटकेत
3 ‘ऑस्ट्रेलियाला लिंबू-टिंबू समजू नकोस’; हेडन सेहवागवर भडकला
Just Now!
X