इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला. ४ सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली. ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव १९२ धावांवर आटोपला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष होते. अशातच मुंबईचा हिटमॅन रोहित शर्माला सूर गवसला. त्याने लगावलेला एक उत्तुंग षटकार खूपच चर्चेत राहिला.

Video: रोहितचा दमदार चौकार पाहून विराटही झाला अवाक…

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणिकर्णधार विराट कोहली फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पण रोहितने मात्र डावाच्या सुरूवातीपासून एक वेगळीच लय पकडली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये वन-डे क्रिकेटप्रमाणे फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने रोहितला आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. त्या चेंडूचा समाचार घेत रोहितने पूल शॉट खेळत षटकार मारला. त्याचा षटकार पाहून पत्नी रितिकादेखील त्याच्या फटक्यावर फिदा झाली.

पाहा व्हिडीओ-

IND vs ENG: मुंबईच्या ‘हिटमॅन’ला चेन्नईमध्ये गवसला सूर

दरम्यान, रोहितने दमदार खेळ सुरू ठेवला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा वेळोवेळी समाचार घेत त्याने अर्धशतक लगावले. रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक ठरले. ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने आणि इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितला चांगली सुरूवात मिळूनही त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करणं शक्य होत नव्हते. पण दुसऱ्या कसोटीत त्याने अर्धशतक ठोकत टीकाकारांना बॅटने उत्तर दिलं.