News Flash

Video : लहानग्यांसाठी क्रिकेटचा देव बनला ‘सांताक्लॉज’

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने जपले सामाजिक भान

आज नाताळचा सण! हा सण संपूर्ण भारतात आणि जगात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त जगभरात ठिकठिकाणी रोषणाई दिसत आहे. अनेल सेलिब्रिटींनी ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टींचे आयोजन केले आहे. या सगळ्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मात्र सामाजिक भान जपले आहे.

आजच्या या नाताळच्या सणानिमित्त सचिनने बच्चे कंपनींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम केले आहे. ख्रिसमस म्हटलं की लाडका सांता आपल्याला छान छान भेटवस्तू आणणार याची बच्चे कंपनी आतुरतेने वाट पाहतात. तेंडुलकर आज अशाच बच्चे कंपनींसाठी सांता बनला होता. त्याने गरीब घरांतील मुलांसाठी कार्य करत असलेल्या आश्रय चाईल्ड केअर सेंटरला भेट दिली आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर एकच हास्य फुलले.

 

नाताळाच्या निमित्ताने तेंडुलकर सांता बनून आश्रमात दाखल झाला. थोड्या वेळानंतर त्याने आपली खरी ओळख मुलांना करुन दिली. तेंडुलकर त्या मुलांसोबत क्रिकेटही खेळला आणि त्यांना भेटवस्तूही दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 7:24 pm

Web Title: video sachin tendulkar became santa claus for kids
Next Stories
1 Video : ऑस्ट्रेलियात आली ‘रहाणे दादा’ अशी मराठमोळी हाक आणि…
2 IND vs AUS : विराट पृथ्वीवरील सर्वोत्तम क्रिकेटपटू – शेन वॉर्न
3 Flashback 2018 : भारतीय कबड्डीला गांभीर्याने विचार करायला लावणारं वर्ष
Just Now!
X