कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. या पराभवासह भारताचे आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न भंगले. भारताने विजयासाठी दिलेलं १३५ धावांचे आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केले. डी-कॉकने नाबाद ७९ धावा केल्या. १७ व्या षटकातच आफ्रिकेने सामन्यात बाजी मारली. तीन टी-२० सामन्यांची ही मालिका अखेरीस १-१ अशा बरोबरीत सुटली आहे.

…म्हणून आम्ही पराभूत झालो – विराट

तिसऱ्या सामन्यात भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली, पण त्याला तबरेझ शम्सी याने बाद केले. आश्चर्याची बाब म्हणजे धवनला बाद केल्यानंतर त्याने बूट काढून जल्लोष केला. त्याने त्याचा बूट कानाला लावून फोन केल्यासारखे केले. गडी बाद झाल्यानंतर आनंद साजरा करण्याची ही वेगळीच पद्धत दिसून आली.

याबाबत सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा रासी याने पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला की शम्सी जेव्हा एखादी महत्त्वाची विकेट घेतो, तेव्हा तो त्याचा आदर्श मानणाऱ्या इम्रान ताहिरला फोन करण्याचे नाटक करतो. म्हणूनच तो कानाला बूट लावतो, असे त्याने सांगितले.

चौथ्या क्रमांकासाठी पंत, अय्यरमध्ये संगीत खुर्चीचा खेळ; कोहलीनं सांगितला गोंधळ

दरम्यान, १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डी-कॉक आणि हेंड्रिग्ज यांनी आफ्रिकेला दणक्यात सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. हेंड्रिग्ज २८ धावांवर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पण डी कॉकने बावुमाच्या साथीने आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

हर्षा भोगले यांनी सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं कारण

त्याआधी, भारतीय फलंदाज बंगळुरुच्या मैदानात पुरते अपयशी ठरले. ब्युरेन हेंड्रिग्ज, बिजॉर्न फोर्टेन यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताला १३४ धावांवर रोखण्यात आफ्रिकेने यश मिळवले. सलामीवीर रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या आणि ऋषभ पंत कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी केली त्यामुळे भारताला १३४ धावांचा टप्पा गाठता आला.