02 March 2021

News Flash

VIDEO: एकदम कडsssक! मुंबईकर श्रेयस अय्यरने लगावला उत्तुंग षटकार

पायाजवळ टप्पा पडलेला चेंडू अय्यरने अतिशय उंच मारला अन्...

ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्यात मैदानात मात देत भारताने दुसरा टी२० सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. कर्णधार मॅथ्यू वेडच्या तुफानी ५८ धावा आणि त्याला स्टीव्ह स्मिथने (४६) दिलेली साथ यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची धावसंख्या उभारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनचं अर्धशतक (५२) आणि हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज नाबाद ४२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने सामना ६ गडी राखून जिंकला.

१९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने धावगतीचा अंदाज घेत हार्दिक पांड्याला श्रेयस अय्यरच्या आधी फलंदाजीसाठी पाठवलं. विराटसोबत पांड्याने चांगली भागीदारी केली. पण अखेर विराट माघारी परतला आणि अय्यर मैदानात आला. अय्यरने लगावलेला उत्तुंग षटकार चर्चेचा विषय ठरला. १५ चेंडूत ३५ धावांची आवश्यकता असताना झॅम्पा गोलंदाजी करत होता. त्याने पायाजवळ टाकलेला चेंडू अय्यरने पूर्ण शक्तनिशी टोलवला. चेंडू अतिशय उंच गेला आणि थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. त्याच्या या षटकाराने भारताच्या डावाला गती मिळाली आणि नंतर हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत सामना जिंकवून दिला.

पाहा व्हिडीओ-

टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा विक्रम

भारतीय संघाचा हा सलग दहावा टी२० विजय ठरला. याआधी भारत आणि पाकिस्तान दोघांनी सलग ९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. पाकिस्तानच्या संघाने २०१८-१९ दरम्यान लागोपाठ ९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता २०१९-२० मध्ये भारताने हा विक्रम मोडला. अफगाणिस्तान संघाने २०१८-१९ मध्ये लागोपाठ १२ सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाने जर आणखी तीन सामने जिंकले तर सर्वाधिक सामने सलग जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 6:45 pm

Web Title: video shreyas iyer biggest six huge hitting sixer in the air to adam zampa ind vs aus t20 hardik pandya virat kohli glenn maxwell watch vjb 91
Next Stories
1 कोहलीनं असा षटकार मारलेला कधी पाहिला का? पाहा व्हिडीओ
2 भारताच्या विजयावर आनंद महिंद्रा म्हणतात….IPL मुळे आपण टी-२० चे मास्टर्स !
3 तुसी ग्रेट हो…! असा पराक्रम करणारा विराट एकमेव कर्णधार
Just Now!
X