News Flash

Video : …म्हणून आफ्रिकेच्या फलंदाजाने ड्रेसिंग रूममध्ये रागाच्या भरात आपटली बॅट

श्रीलंकेविरुद्धचा सामना दक्षिण आफ्रिकेने ११३ धावांनी जिंकला

श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने ११३ धावांनी जिंकला. २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला मात्र केवळ १३८ धावाच करता आल्या. श्रीलंकेचा डाव ३२.२ षटकात संपुष्टात आला. क्विंटन डी कॉकच्या धडाकेबाज ९४ धावांच्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने २५१ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात डी कॉकच्या खेळीची तर चर्चा झालीच. पण त्यापेक्षा अधिक चर्चा झाली ती त्याने ड्रेसिंग रूममध्ये बॅटवर काढलेल्या रागाची…

प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेने २५१ धावा केल्या. आफ्रिकेला पूर्ण ५० षटके खेळता आली नाहीत. पण ४५.१ षटकात आफ्रिकेने अडीचशे धावांची मजल मारली. या सामन्यात क्विंटन डी कॉकने १७ चौकार आणि १ षटकार फटकावत ७० चेंडूत ९४ धावा केल्या. पण त्याला शतक पूर्ण करता आले नाही. थिसारा परेराच्या गोलंदाजीवर त्याने डिकवेल्लाकडे झेल दिला. त्यामुळे चिडलेल्या डी कॉकने पूर्ण राग आपल्या बॅट वर काढला. ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर त्याने चक्क बॅट २ ते ३ वेळा आपटली. त्याचा हा व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे.

दरम्यान या सामन्यात आफ्रिकेकडून डू प्लेसिसनेदेखील अर्धशतकी खेळी केली. त्याने ६६ चेंडूत ५७ धावा केल्या. श्रीलंकेकडून मात्र ओसाका फर्नांडोयाने सर्वाधिक ३१ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 7:02 pm

Web Title: video south africa batsman quinton de kock smashes bat in dressing room after getting out for 94
Next Stories
1 IND vs AUS : धोनीचा मास्टरप्लॅन! …आणि कुलदीपने उडवला मॅक्सवेलचा त्रिफळा
2 आयपीएलदरम्यान थकवा जाणवल्यास जरुर विश्रांती घेईन – भुवनेश्वर कुमार
3 महाराष्ट्र श्री : सुनीत जाधवचा जेतेपदाचा षटकार; अमला ब्रम्हचारी ‘मिस महाराष्ट्र’
Just Now!
X