01 October 2020

News Flash

VIDEO : स्विंग अन् क्लीन बोल्ड! चेंडू न समजल्याने फलंदाजही झाला अवाक

पाहा आर्चरने कसा उडवला त्रिफळा

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हा पहिला कसोटी सामना ५ ऑगस्टपासून मँचेस्टर येथे सुरू झाला. या सामन्यातील पहिल्या दिवसाचा बराचसा खेळ वाया गेला. पण दिवसभरात झालेल्या ४९ षटकांच्या खेळात पाकिस्तानने वर्चस्व राखले. बाबर आझमने आपली लय कायम राखत शानदार अर्धशतक झळकावले. शान मसूदनेही अर्धशतकी खेळी करत त्याला साथ दिली. या साऱ्या चर्चांमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने उडवलेला त्रिफळा भाव खाऊन गेला.

जोफ्रा आर्चरने आपल्या जबरदजस्त गोलंदाजीने पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज आबिद अलीला त्रिफळाचीत केले आहे. हा इंग्लंडने पाकिस्तानला दिलेला पहिला धक्का होता. आबिद आर्चरच्या दमदार इन स्विंगरचा सामना करु शकला नाही. १६ धावांवर तो क्लीन बोल्ड झाला. चेंडू आबिदच्या बॅट आणि पॅडच्या मधून निघून गेला आणि सरळ स्टंपला जाऊन लागला. महत्त्वाचे म्हणजे त्याला स्वत:लादेखील तो चेंडू न समजल्याने त्याने मागे वळून बाद झाल्याची खात्री केली अन अवाक होत तंबूत परतला.

पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज आबिद हा याने शान मसूदसोबत संयमी फलंदाजीला सुरूवात केली होती. पण १६व्या षटकात त्याला आर्चरने माघारी धाडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 5:29 pm

Web Title: video swing and clean bowled jofra archer sent back abid ali with outstanding inswinger vjb 91
Next Stories
1 VIDEO : अखेरच्या फलंदाजाने हॅटट्रिक हुकवण्यासाठी मारला फटका आणि…
2 VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित, BCCI कडून अधिकृत घोषणा
3 ‘त्या’ क्षणी मी देशाला फसवलंय असं वाटत होतं !
Just Now!
X