भारतीय संघाचा बुधवारी (१४ ऑगस्ट) विंडिज विरुद्ध तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना होणार आहेय. या मालिकेतील पहिला भारत-विंडीज सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे आता या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी भारतीय संघाला आहे, तर शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी यजमान संघाकडे आहे.

पावसामुळे अनेकदा व्यत्यय आणला होता. पण, या सर्व गोष्टींना न जुमानता टीम इंडियाने आक्रमक खेळी केली आणि सामना जिंकला. दुसऱ्या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. आणि आता दोन्ही संघ पुन्हा एकदा पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स क्लबच्या मैदानात या मालिकेत आमने-सामने असतील.

तिसऱ्या सामन्यासाठी दोनही संघ आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण त्याआधी भारतीय संघातील खेळाडूंनी काही काळ विश्रांती करत पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भटकंती केली. भारताचा ‘गब्बर’ शिखर धवन, नवखा फलंदाज श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद आदी भारतीय खेळाडू डोंगऱ्याच्या कडेकपाऱ्यात पारंब्यांना लोंबकाळून पाण्यात पोहोण्याचा आनंद घेताना दिसले. याशिवाय, शिखर धवन आपल्या सुपरकूल अंदाजात बोटीवरून ‘फ्लिप’ उडी मारत पोहण्याचा आनंद घेतला. तसेच इतर खेळाडूंनीही तुफान मजा मस्ती केली. इतकेच नव्हे तर विंडिजचे कायरन पोलार्ड, निकोलस पूरन हे खेळाडू देखील टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत दिसले.

 

View this post on Instagram

 

Open water, the greenery and fresh air = bliss.

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

 

View this post on Instagram

 

You can’t tell me I ain’t fly!

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41) on

 

View this post on Instagram

 

Everything is artificial, except this!

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

दरम्यान, एकदिवसीय मालिका संपली की २२ ऑगस्टपासून भारत-विंडिज यांच्यात कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे.