Video : शाब्बास! विराटने थोपटली रोहितची पाठ

रोहितने संधीचं सोनं करत पहिल्याच प्रयत्नात दीडशतक ठोकले

भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर डीन एल्गरने केलेले संयमी दीडशतक (१६०) आणि क्विंटन डी कॉकने मोक्याच्या क्षणी केलेले शतक (१११) याच्या बळावर आफ्रिकेने तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ३८५ धावांपर्यंत मजल मारली. आफ्रिकेच्या डावाची सुरूवात अत्यंत खराब झाली होती. पण सलामीवीर डीन एल्गर, कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक यांच्या खेळीमुळे आफ्रिकेला सामन्यात पुनरागमन करता आले.

IND vs SA : एकच वादा रोहित दादा! ‘असा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

सामन्याचे पहिले दोन दिवस मात्र भारताच्या संघाचे होते. प्रथमच सलामीवीर म्हणून फलंदाजी करणाऱ्या रोहितने पहिल्याच सामन्यात दीडशतक ठोकले. त्याने २४४ चेंडूत १७६ धावा केल्या. त्याच्या या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. मयांक अग्रवालच्या साथीने रोहितने पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली. पण अखेरीस केशव महाराजच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित यष्टीचीत होऊन माघारी परतला. तो तंबूत परतताना साऱ्यांनी त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या. पण विराटने मात्र त्याची पाठ थोपटली. विराटच्या या कृतीचे क्रिकेटप्रेमींनीही कौतुक केले.

 

View this post on Instagram

 

knock from @rohitsharma45 The dressing room acknowledges #TeamIndia  #INDvSA

A post shared by Team India (@indiancricketteam) on

दरम्यान, मयांक अग्रवालच्या साथीने भारतीय डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने शतकी खेळीची नोंद केली. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने रोहितचं हे पहिलं तर एकूण कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक ठरलं. वन-डे, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.

READ SOURCE