25 February 2021

News Flash

Ind vs Eng Video: विराट – पंच यांच्यात बाचाबाची; पाहा नक्की काय घडलं…

तुम्ही पाहिला का व्हिडीओ

भारताविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली. रविचंद्रन अश्विनचे दमदार शतक आणि कर्णधार विराटचे अर्धशतक याच्या जोरावर भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने इंग्लंडला ४८२ धावांचे अंतिम लक्ष्य दिले. रविचंद्रन अश्विन याने दमदार शतक ठोकलंच पण विराटनेदेखील दमदार अर्धशतक लगावले. त्याच्या खेळीदरम्यान विराट आणि पंचांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.

Ind vs Eng Video: रोहित – पंत यांच्यात मैदानावर राडा? पाहा नक्की काय झालं…

अश्विन आणि विराट मैदानावर असताना डावाच्या तिसाव्या षटकात हा प्रकार घडला. कोहलीने धाव घेतल्यानंतर पंचांनी त्याला ताकीद दिली. कोहलीने पंचांना प्रश्न विचारताच पंचांनी त्याला बोलवून घेतलं आणि त्याला घडलेला प्रकार सांगितला. खेळपट्टीवरून धाव घेताना प्रतिबंधित क्षेत्रातून त्याने धाव घेतली होती असं पंचांनी त्याला सांगितलं आणि वॉर्निंग दिली. कोहलीला मात्र हा प्रकार मान्य नसल्याने काही काळ पंच आणि कोहलीमध्ये बाचाबाची झाली. अखेर पंच आपल्या निर्णयावर ठाम असल्याने कोहली नाराजी दर्शवत तेथून निघून गेला.

पाहा व्हिडीओ-

IND vs ENG: अफलातून अश्विन!! सर गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाशी केली बरोबरी

दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळात सकाळच्या सत्रात भारताचे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाले. कर्णधार विराट कोहलीसोबत अश्विनने ९६ धावांची भागीदारी केली. विराट (६२) बाद झाल्यावर अश्विनने तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन १०६ धावांची खेळी केली आणि इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान दिले. त्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर डॉम सिबली (३), रॉरी बर्न्स (२५) आणि नाईट वॉचमन जॅक लीच (०) स्वस्तात बाद झाले. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून इंग्लंडला विजयासाठी ४२९ धावांची गरज आहे तर भारताला ७ गड्यांची आवश्यकता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 7:51 pm

Web Title: video virat kohli fight with umpire over running over danger area watch ind vs eng 2nd test vjb 91
Next Stories
1 IND vs ENG: अफलातून अश्विन!! सर गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाशी केली बरोबरी
2 याला म्हणतात टीम स्पिरिट, शतक अश्विनचं पण सिराजने केलं असं काही….
3 जबरदस्त! अश्विनच्या दमदार खेळीनंतर बायकोच्या एका टि्वटने टीकाकार झाले गार
Just Now!
X