News Flash

Video : अशा विचित्र पद्धतीने फलंदाजाला बाद होताना पाहिलं आहेत का??

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात घडला प्रकार

टीम पेनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने संघाने न्यूझीलंडला घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत ३-० ने पराभूत करत नवीन वर्षाची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने केली. अखेरच्या सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि २७९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जेम्स पॅटिन्सन मोठ्या विचित्र पद्धतीने बाद झाला.

पहिल्या डावात फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाने ४५४ धावांचा पल्ला गाठला. लाबूशेनने २१५ धावा करत संघाची बाजू भक्कम करण्यात मोलाची भूमिका बजावली. यादरम्यान अखेरच्या फळीत जेम्स पॅटिन्सन न्यूझीलंडच्या निल वेंगरचा सामना करत होता. निलने टाकलेला चेंडू अपेक्षेप्रमाणे बाऊन्स न झाल्यामुळे पॅटिन्सनचा अंदाज चुकला, यावेळी चेंडू पॅटिन्सनच्या खांद्याला लागून ग्लोव्ह्जवर आदळला….आणि पुढे त्याला काही समजण्याच्या आत बॅटच्या मागच्या भागावरुन थेट स्टम्पवर जाऊन आदळला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ आपल्या ट्विर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

पॅटिन्सन या सामन्यात फक्त दोन धावा करु शकला, याचसोबत गोलंदाजीमध्येही त्याला एकही विकेट मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली असली तरीही पॅटिन्सनच्या अशा विचित्र पद्धतीने बाद होण्याची चर्चा सर्वत्र सुरु होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 4:49 pm

Web Title: video watch how australian player james pattinson gets out funny way against new zealand psd 91
Next Stories
1 Video : सामना सुरू असताना इंग्लंडचा खेळाडू काय करतोय बघा…
2 अजिंक्यची लेक जेव्हा पहिल्यांदा आपल्या पणजीला भेटते…!
3 लोकं बोलत राहतील, तू लक्ष देऊ नकोस ! ऋषभ पंतची रोहितकडून पाठराखण
Just Now!
X