01 March 2021

News Flash

Video : ४६ षटकार, ८०७ धावा! इंग्लंड-विंडीजच्या फलंदाजांची ही आतषबाजी एकदा पाहाच

याआधी सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम भारत व ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.

विंडीज विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम झाला आहे. धडाकेबाज फलंदाजांनी भरलेल्या दोन्ही संघांनी मिळुन तब्बल ४६ षटकार मारले. यांत इंग्लंडने २४ षटकारांसह ४१८ धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना विंडीजने २२ षटकारांसह ३८९ धावा केल्या. दोन्ही संघांनी मिळुन तब्बल ८१७ धावांचा विक्रम केला. याआधी सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम भारत व ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २०१३ मध्ये बंगळुरु स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळुन ३८ षटकार मारले होते.

 

ग्रेनाड स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश फलंदाजांनी सपाट खेळपट्टीचा फायदा उचलत ५० षटकांमध्ये तब्बल ४१८ धावांचा डोंगर रचला. यांत इंग्लिश फलंदाजांनी २४ षटकार मारले. पहिला डाव संपल्या नंतर आता क्रिकेट रसिकांच्या नजरा वेस्टइंडीजच्या ख्रिस गेलवर होत्या. त्यानेही आपल्या नावाप्रमाणेच तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन केले. गेलने केवळ ९७ चेंडूत १६२ धावा केल्या. दरम्यान त्याने १४ षटकार मारले. परंतु गेल बाद झाल्यानंतर मात्र इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीज फलंदाज टिकाव धरु शकले नाही आणि शेवटी त्यांनी २९ धांवांनी सामना गमावला. ग्रेनाड स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी मिळुन तब्बल ८१७ धावांचा विक्रम केला.

हा सामना विंडीजने गामावला असला तरी तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने दोन नव्या विक्रमांची नोंद केली. त्याने १६२ धावांसह एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नाव मिळवले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० षटकार मारण्याचा विक्रमही केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 2:39 pm

Web Title: video west indies vs england record 46 sixes 807 runs
Next Stories
1 IND vs AUS : मालिका गमावली, पण विराटने रचला विश्वविक्रम
2 राहुल द्रविडमुळेच यशस्वी पुनरागमन करु शकलो – लोकेश राहुल
3 World Squash Championships : भारताच्या सौरवची उपांत्यपूर्व फेरीत धडक
Just Now!
X