मास्टर ब्लास्टर माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन बुधवारी लॉर्ड्स स्टेडियमवर इंग्लंडच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. लॉर्ड्सवरील अर्जुनच्या उपस्थितीची तेथील प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली. अर्जुनच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी सराव केल्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. प्रतिष्ठेच्या अशा अॅशेस मालिकेतील दुसऱया सामन्यासाठीच्या इंग्लंडच्या सरावा शिबिरात इंग्लंडच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करण्यासाठी ‘एमसीसी’च्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या गट नेमण्यात आला होता. त्यामध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश होता. अर्जुन हा लॉर्ड्स इनडोअर स्टेडियममध्ये नियमित खेळणारा खेळाडू असल्यामुळे त्याला आमंत्रित करण्यात आले. या निमित्ताने अर्जुनला इंग्लंडच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. अर्जुनने इंग्लंडच्या फलंदाजांना नेटमध्ये डावखु-या मध्यमगती गोलंदाजीचा सराव दिला. डावखुरे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना डोईजड ठरतात असा इतिहास असल्याने अर्जुनला पसंती देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अर्जुनच्या गोलंदाजीचा व्हिडिओ-