News Flash

Video : Wimbledon 2018 – टेनिस कोर्ट गाजवणारी पावलं जेव्हा डान्स फ्लोअरवर थिरकतात…

Wimbledon 2018 - विम्बल्डन विजेत्यांनी 'चॅम्पियन्स डिनर'मध्ये केले नृत्य

विम्बल्डन विजेते अँजेलिक कर्बर आणि नोव्हाक जोकोव्हिच

Video : यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीत प्रस्थापित सेरेना विल्यम्स हिला पराभवाचा धक्का देत जर्मनीची अँजेलिक कर्बर हिने विजेतेपद पटकावले. तिचे हे पहिलेवहिले विम्बल्डन विजेतेपद ठरले. त्यामुळे पुरुष एकेरीतही पहिल्यांदा विम्बल्डन फायनल खेळणारा केविन अँडरसन इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण तसे न घडता नोव्हाक जोकोव्हिच याने आपले ४थे विम्ब्लडन विजेतेपद पटकावले.

या विजयानंतर नोव्हाक जोकोव्हिच आणि अँजेलिक कर्बर या दोघांनाही विम्बल्डनच्या चॅम्पियन्स डिनरसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी कर्बरला मुलाखतीदरम्यान जोकोव्हिचबरोबर गाण्यावर ठेका धरण्याचा आग्रह केला गेला. कर्बरनेही आढेवेढे न घेता पटकन नृत्य करण्यास होकार दिला. या दोघांच्या नृत्याने साऱ्यांना ठेका धरायला लावला. विम्बल्डनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याबद्दल एक पोस्ट केली असून हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला सुमारे १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, अंतिम फेरीत सेरेना विल्यम्सला अँजेलिक कर्बरने ६-३, ६-३ असे पराभूत केले होते. तर पुरुष गटात नोव्हाक जोकोव्हिचने आफ्रिकेच्या केविन अँडरसन याला ६-२, ६-२, ७-६ (७-३) असे पराभूत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2018 12:14 pm

Web Title: video wimbledon 2018 winners champions dinner dance
टॅग : Dance
Next Stories
1 धोनीचा रटाळ खेळ बघून गावस्करांना आठवली स्वत:ची ‘ती’ कुप्रसिद्ध खेळी
2 मधल्या फळीतील अपयशाचीच भारताला चिंता
3 अखेरच्या वन-डे आधी इंग्लंडच्या गोटात चिंतेचं वातावरण, जेसन रॉय दुखापतग्रस्त
Just Now!
X