News Flash

विदित गुजराथी संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी

ग्रँड युरोप गोल्डन सॅण्ड्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विदित गुजराथीने इस्रायलच्या तामिर नाबाटीविरुद्धची लढत बरोबरीत राखली आणि सहाव्या फेरीअखेर संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी मजल मारली.

| June 17, 2013 02:18 am

ग्रँड युरोप गोल्डन सॅण्ड्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विदित गुजराथीने इस्रायलच्या तामिर नाबाटीविरुद्धची लढत बरोबरीत राखली आणि सहाव्या फेरीअखेर संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी मजल मारली.
चेक प्रजासत्ताकचा झायबनक रासेक आणि रोमानियाच्या व्लादिस्लाव्ह नेव्हेडिनीची अध्र्या गुणाने गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. विदितचे पाच गुण झाले आहेत. भारताचा ग्रँडमास्टर एस. अरुण प्रसादने इटलीच्या अलेसान्ड्रो बोनाफेडला नमवत विदितप्रमाणेच तिसरे स्थान पटकावले.
स्पर्धेतील अव्वल मानांकित अभिजित गुप्ताचे ४.५ गुण झाले असून, त्यालाही अव्वल तीनमध्ये स्थान पटकावण्याची संधी आहे.
ग्रँडमास्टर एम. आर. वेंकटेश, जी. एन. गोपाळ, दीप सेनगुप्ता आणि आंतरराष्ट्रीय मास्टर एन. श्रीनाथ आणि अश्विन जयराम या अन्य भारतीय खेळाडूंचेही ४.५ गुण झाले आहेत. एन. श्रीनाथने अर्मेनियाच्या अवेतिक ग्रिगोरायनवर खळबळजनक विजय मिळवला. गोपाळने अव्वल मानांकित टायग्रन पेट्रोसिअनविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. अश्विन जयराम आणि बल्गेरियाचा रुसेव्ह क्रॅसिमीर तर वेंकटेश आणि अभिजित गुप्ता यांच्यातील लढतीही बरोबरीत संपल्या. दीप सेनगुप्ताने भारताच्याच मुरली कार्तिकेयनला नमवले.
ग्रँडमास्टर किताबाच्या शर्यतीत असणाऱ्या सहज ग्रोव्हरला पराभवाला सामोरे जावे लागले. माँटेग्रोच्या द्रागिसा ब्लागोजेव्हिकने त्याचा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2013 2:18 am

Web Title: vidit gujarati jointly on third position
टॅग : Chess,Sports
Next Stories
1 दुखापतग्रस्त एलियटच्या जागी अ‍ॅण्डरसन न्यूझीलंडच्या संघात
2 मेस्सीने मॅराडोनाला मागे टाकले
3 जर्मनीकडून भारताचा धुव्वा
Just Now!
X