26 February 2021

News Flash

श्रेयसच्या शतकामुळे मुंबईचे ‘धवल’ यश!

महाराष्ट्राच्या नाहर, काझी यांची शतके व्यर्थ

(संग्रहित छायाचित्र)

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा

कर्णधार श्रेयस अय्यरने (९९ चेंडूंत नाबाद १०३ धावा) साकारलेले दिमाखदार शतक आणि अनुभवी धवल कुलकर्णीच्या (५/४४) भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राचा सहा गडी आणि १६ चेंडू राखून सहज धुव्वा उडवला.

जयपूरच्या के. एल. सैनी मैदानावर झालेल्या ‘ड’ गटातील या सामन्यात महाराष्ट्राने दिलेले २८० धावांचे लक्ष्य मुंबईने ४७.२ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. सलग दुसऱ्या विजयामुळे मुंबईने आठ गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले आहे. महाराष्ट्राच्या यश नाहर (११९) व अझिम काझी (१०४) यांची शतके व्यर्थ ठरली. गुरुवारी होणाऱ्या तिसऱ्या साखळी सामन्यात मुंबईची पुदुचेरीशी, तर महाराष्ट्राची राजस्थानशी गाठ पडणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राची कुलकर्णीच्या माऱ्यापुढे ४ बाद ३८ धावा अशी अवस्था झाली. अनुभवी केदार जाधव (५) याच्यासह कर्णधार ऋतुराज गायकवाड (१९), अंकित बावणे (०), नौशाद शेख (०) स्वस्तात माघारी परतले. मात्र त्यानंतर नाहर-काझी यांच्या जोडीने पाचव्या गडय़ासाठी तब्बल २१४ धावांची भागीदारी रचल्यामुळे महाराष्ट्राने ५० षटकांत ९ बाद २७९ धावांपर्यंत मजल मारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना गेल्या सामन्यातील शतकवीर पृथ्वी शॉ (३४), यशस्वी जैस्वाल (४०), सूर्यकुमार यादव (२९) आणि शिवम दुबे (४७) यांनी मुंबईसाठी बहुमोल योगदान दिले. अय्यरने मात्र अखेपर्यंत नाबाद राहून नऊ चौकार आणि एका षटकारासह १०३ धावा फटकावल्या. त्याने चौथ्या गडय़ासाठी दुबेसह ९८ धावांची भागीदारी रचून मुंबईचा विजय सुनिश्चित केला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : ५० षटकांत ९ बाद २७९ (यश नाहर ११९, अझिम काझी १०४; धवल कुलकर्णी ५/४४) पराभूत वि. मुंबई : ४७.२ षटकांत ४ बाद २८० (श्रेयस अय्यर नाबाद १०३, शिवम दुबे ४७; सत्यजीत बच्छाव ३/५९)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:17 am

Web Title: vijay hazare cricket tournament maharashtra defeated by mumbai abn 97
Next Stories
1 “आयुष्यातील सर्वात गोड गिफ्ट”, टी नटराजनने शेअर केला मुलीसोबतचा गोंडस फोटो
2 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांत बदलांचे संकेत
3 करोनाचे भय किती काळ बाळगणार?
Just Now!
X