अझिम काझीच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा तीन गडी आणि आठ चेंडू राखून पराभव केला.

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हिमाचल प्रदेशला २०१ धावापर्यंतच मजल मारता आली. त्यांच्या अमित कुमारने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली.

हे आव्हान पेलताना नौशद शेख आणि अझिम काझी यांनी अनुक्रमे ३६ आणि ८४ धावा करून १०९ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर निखिल नाईक (नाबाद ३२) आणि शम्शूझामा काझी(नाबाद २१) यांनी आणखी पडझड न होता विजयावर शिक्कामोर्तब केले.