23 September 2020

News Flash

विजय कुमार, गगन नारंग, अभिनव बिंद्रा राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार

लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता विजय कुमार आणि कांस्यपदक विजेता गगन नारंग दिल्लीत बुधवारपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होत आहेत.

| December 19, 2012 07:53 am

लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता विजय कुमार आणि कांस्यपदक विजेता गगन नारंग दिल्लीत बुधवारपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होत आहेत. यांच्यासह बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, अ‍ॅथेन्स ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता राज्यवर्धन सिंग राठोड, रंजन सोधी आणि जॉयदीप कर्माकर हे अव्वल नेमबाजही सहभागी होणार आहेत.
महिला गटात अंजली भागवत, सुमा शिरूर या वरिष्ठ नेमबाजांसह हिना सिधू, मम्पी दास या नेमबाज सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय नेमबाजी संघटनेशी संलग्न ४१ संघटनांकडून मिळून २३०० नेमबाज आपले कौशल्य आजमवणार आहेत, अशी माहिती भारतीय नेमबाजी संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 7:53 am

Web Title: vijay kumar gagan narang abhinav bindra will play in national games
Next Stories
1 सौराष्ट्रविरुद्धची लढत अनिर्णीत
2 सचिन तेंडुलकर विरुद्धची जनहीत याचिका न्यायालयाने फेटाळली
3 इंग्लंडचा ऐतिहासिक विजय
Just Now!
X