कै. पै. छबुराव लांडगे क्रीडानगरीत (वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल) सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरीपदाच्या लढतीत किताबाचा प्रबळ दावेदार विजय चौधरी याच्यासह नगरच्या योगेश पवार, गोकुळ आवारे (बीड), अमोल फडतरे (सातारा), रफिक पठाण (औरंगाबाद) यांनी मातीतल्या कुस्तीमध्ये बाजी मारली.
गतवेळचा उपमहाराष्ट्र केसरी विजेत्या अतुल पाटील (जळगाव) व नंदू आब्दार (कोल्हापूर), सचिन येलभारे व महेश मोहोळ (पुणे), राजेंद्र राजमाने (मुंबई) यांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.
दरम्यान ६१ किलो गटाच्या मॅटवरील लढतीत पुण्याचा उत्कर्ष काळे सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, सोलापूरच्या सोनबा गोंगाणे याने रौप्य, तर नगरच्या संदीप कावरे याने कांस्यपदक पटकावले. पुणे शहरचा रावसाहेब घोरपडे चौथ्या स्थानावर राहिला.
सविस्तर निकाल -मॅट विभाग : अतुल पाटील (विजयी, जळगाव विरुद्ध रवींद्र गायकवाड, सचिन येलभार (विजयी, पुणे) विरुद्ध अक्षय शिंदे (बीड), राजेंद्र राजमाने (विजयी, मुंबई) विरुद्ध ज्ञानेश्वर जमदाडे (कोल्हापूर), नंदू आब्दार (विजयी, कोल्हापूर) विरुद्ध संभाजी शिंदे (परभणी), अतुल धरत (विजयी, रायगड) विरुद्ध अक्षय वाघ (औरंगाबाद), ज्ञानेश्वर गोचडे (विजयी, लातूर) विरुद्ध गौरव गणोरे (नाशिक), अभिषेक घुगे (विजयी, पुणे).
माती विभाग : योगेश पवार (विजयी, नगर) विरुद्ध मारुती जाधव (सांगली), गोकुळ आवारे (विजयी, बीड) विरुद्ध योगेश दरेकर (नाशिक), विजय चौधरी (विजयी, जळगाव) विरुद्ध दीपक बांदल (ठाणे), अमोल फडतरे (विजयी, सातारा) विरुद्ध नितीन केचे (हिंगोली).