30 September 2020

News Flash

भारतीय क्रिकेट ‘अ’ संघात झोल, जाधवचा समावेश

भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार विजय झोल तसेच दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणारा केदार जाधव या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंचा भारताच्या ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे. न्

| August 8, 2013 01:55 am

भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार विजय झोल तसेच दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणारा केदार जाधव या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंचा भारताच्या ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंड ‘अ’ व वेस्ट इंडिज ‘अ’ संघांबरोबर होणाऱ्या सामन्यांसाठी या संघांची निवड करण्यात आली.
न्यूझीलंड ‘अ’ संघाचा ३१ ऑगस्टपासून विशाखापट्टणम येथे दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात हा संघ भारत ‘अ’ संघाबरोबर तीनएकदिवसीय सामने तसेच तीन व चार दिवसांचे सामने खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व दिल्लीचा उदयोन्मुख फलंदाज उन्मुक्त चंदकडे सोपवण्यात आले आहे. तीन व चार दिवसांच्या सामन्यांसाठी भारताचे नेतृत्व मुंबईचा अभिषेक नायर करणार आहे.

तीन व चार दिवसांच्या सामन्यांसाठी संघ-
अभिषेक नायर (कर्णधार, मुंबई), जीवनज्योतसिंग (पंजाब), उनमुक्त चंद (दिल्ली), विजय झोल (महाराष्ट्र), मनप्रीत जुनेजा (गुजरात), व्ही. जगदीश (केरळ), सी.एम.गौतम (कर्नाटक), धवल कुलकर्णी (मुंबई), इम्तियाझ अहमद (उत्तर प्रदेश), अनिकेत चौधरी (राजस्थान), श्रीकांत वाघ (विदर्भ), जलज सक्सेना (मध्य प्रदेश), राकेश ध्रुव (गुजरात), सरबजित लड्डा (पंजाब).

एक दिवसीय सामन्यांकरिता संघ-
उनमुक्त चंद (कर्णधार, दिल्ली), रॉबिन उथप्पा (कर्नाटक), आदित्य तरे (मुंबई), केदार जाधव (महाराष्ट्र), मनदीपसिंग (पंजाब), अशोक मणेरिया (राजस्थान), संजू विश्वनाथ (केरळ), सचिन बेबी (केरळ), धवल कुलकर्णी (मुंबई), बसंत मोहंती (ओरिसा), संदीप शर्मा (पंजाब), श्रीकांत वाघ (विदर्भ), राहुल शर्मा (पंजाब), जलज सक्सेना (मध्य प्रदेश)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2013 1:55 am

Web Title: vijay zol and kedar jadhav got selected for india a team
टॅग Vijay Zol
Next Stories
1 बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
2 फेरा कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी मनोहर यांना दिलासा
3 ताजिकिस्तानविरुद्धची लढत आव्हानात्मक -गौरमांगी सिंग
Just Now!
X