28 February 2021

News Flash

विजय झोलकडे भारताचे नेतृत्व

महाराष्ट्राचा विजय झोल १९ वर्षांखालील संघांच्या आशिया चषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. २८ डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा होणार आहे.

| November 29, 2013 01:26 am

महाराष्ट्राचा विजय झोल १९ वर्षांखालील संघांच्या आशिया चषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. २८ डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा होणार आहे. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीच्या झालेल्या बैठकीत झोलच्या कर्णधारपदावर शिक्कामोर्तब झाले.
२०११ मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये १९ वर्षांखालील संघासाठी खेळताना जालन्याच्या विजयने ४५१ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती.
या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, मलेशिया हे संघ सहभागी होणार आहेत. भारताची सलामीची लढत २८ डिसेंबरला संयुक्त अरब अमिराती संघाशी होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताचा मुकाबला ३१ डिसेंबरला होणार आहे. ४ जानेवारीला अंतिम लढत होईल.
भारताचा १९ वर्षांखालील संघ : विजय झोल (कर्णधार), संजू सॅमसन, अखिल हेरवाडकर, अंकुश बैन्स, रिकी भुई, श्रेयस अय्यर, सर्फराझ खान, दीपक हुडा, कुलदीप यादव, आमिर गनी, करन कैला, सी. व्ही. मिलिंद, अवेश खान, रिशी आरोठे, मोनू कुमार सिंग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:26 am

Web Title: vijay zol to captain india in under 19 asia cup
टॅग : Vijay Zol
Next Stories
1 फुटबॉलमध्येही फिक्सिंगची वाळवी : कथित आरोपांप्रकरणी तीन खेळाडू अटकेत
2 धवनच्या धडाक्यामुळे विजयाचे ‘शिखर’ सर
3 मकाऊ ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, सायलीची विजयी सलामी
Just Now!
X