06 August 2020

News Flash

व्यावसायिक लढतीत विजेंदरपुढे इंग्लंडच्या व्हायटिंगचे आव्हान

मिडलवेट गटात व्हायटिंगने आतापर्यंत केवळ तीनच व्यावसायिक लढती खेळल्या आहेत.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगला व्यावसायिक बॉक्सिंगमधील सलामीच्या लढतीत इंग्लंडचा उदयोन्मुख खेळाडू सोनी व्हायटिंगचे आव्हान असणार आहे. ही लढत १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
मिडलवेट गटात व्हायटिंगने आतापर्यंत केवळ तीनच व्यावसायिक लढती खेळल्या आहेत. त्यापैकी दोन लढतींमध्ये त्याने विजय मिळविला आहे, तर एक लढत गमावली आहे. उज्ज्वल भवितव्य लाभलेला खेळाडू म्हणून त्याने ख्याती मिळविली आहे.
‘‘व्हायटिंगविरुद्ध विजय मिळविणे सोपे नाही. व्यावसायिक लढतींचा त्याला अल्प अनुभव असला तरी तो अतिशय लढवय्या खेळाडू आहे. या लढतींमधील अनुभवाचा फायदा त्याला मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही लढत जिंकण्यासाठी मी लक्ष केंद्रित केले आहे व त्यासाठी कसून सराव करीत आहे,’’ असे विजेंदरने आगामी लढतीबाबत सांगितले.
व्हायटिंगला माजी व्यावसायिक बॉक्सर जॉनी ग्रीव्हज यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विजेंदरविरुद्धच्या लढतीबाबत आत्मविश्वास प्रकट करताना व्हायटिंग म्हणाला, ‘‘माझी लढत कोणत्या खेळाडूबरोबर आहे, त्याचा पूर्वइतिहास काय आहे, याची मी पर्वा करीत नाही. विजय मिळविण्यासाठीच मी नेहमी खेळत असतो.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2015 1:12 am

Web Title: vijender singh to face sonny whiting in pro boxing debut fight
टॅग Vijender Singh
Next Stories
1 आशियाई नेमबाजी स्पर्धा : गुरप्रीतला रौप्यपदक, तर जितू रायला कांस्य
2 भारत ‘अ’ग्रेसर : ट्वेन्टी-२० सराव सामना : सराव सामन्यात दक्षिण आफ्रिका पराभूत
3 तीन दिवसीय कसोटी सामना : बांगलादेश ‘अ’ संघावर एका डावाने विजय
Just Now!
X