23 September 2020

News Flash

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : विकास, गौरवचे पदक निश्चित

विकासने कझाकिस्तानच्या तुर्सीन्बे कुलाख्मेतवर सहज विजय मिळवला.

| February 24, 2018 03:47 am

विकास कृष्णन (७५ किलो) व गौरव सोलंकी (५२ किलो) या भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळवून आपले पदक निश्चित केले आहे.

माजी आशियाई क्रीडा विजेता विकास कृष्णन (७५ किलो) व गौरव सोलंकी (५२ किलो) या भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळवून आपले पदक निश्चित केले आहे.

विकासने कझाकिस्तानच्या तुर्सीन्बे कुलाख्मेतवर सहज विजय मिळवला. हाताच्या दुखापतीमुळे अनेक दिवस सरावापासून वंचित असलेल्या विकासचा हा विजय निश्चितच अपेक्षा उंचावणारा आहे. गौरवने किर्गिझस्तानच्या अझात उसेनालिएवचे आव्हान संपुष्टात आणले. भारताच्या अमित पांघल (४९ किलो) व महम्मद हुसामुद्दीन (५६ किलो) यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे.

महिलांमध्ये एम.सी.मेरी कोम, एल.सरिता देवी, सीमा पुनिया, सविता बुरा, मीनाकुमारी देवी व भाग्यबती कचरी यांनीही उपांत्य फेरीत स्थान मिळवत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 1:01 am

Web Title: vikas gaurav enter semis of strandja memorial boxing
Next Stories
1 चेतेश्वर पुजारा बनला ‘बाप’माणूस, ट्विटरवरुन लाडक्या मुलीसोबतचा फोटो केला शेअर
2 कोरिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची निवड, राणी रामपालकडे संघाचं नेतृत्व
3 श्रीलंकेतील तिरंगी टी-२० मालिकेत कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता
Just Now!
X