इराणच्या एहसान हदादीचे आव्हान फारसे गांभीर्याने न घेतल्यामुळे भारताच्या विकास गौडाला अ‍ॅथलेटिक्समधील थाळीफेकीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टिंटू लुकाने अंतिम फेरी गाठली.
विकासने नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. त्यामुळे येथे तो सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात होता. मात्र त्याने ६२.५८ मीटपर्यंत थाळीफेक केली. त्याने या मोसमात ६५.६२ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे, तसेच ६६.२८ मीटर हा राष्ट्रीय विक्रमही त्याच्या नावावर आहे. या कामगिरीपेक्षाही त्याने कमी दर्जाची कामगिरी करीत सोनेरी यशाची संधी गमावली. हदादी याने ६५.११ मीटपर्यंत थाळीफेक करीत सुवर्णपदक मिळविले व सोनेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली. २००६ व २०१० मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळविले होते. विकासला २००६ मध्ये कांस्यपदक मिळाले होते.  
पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राचा खेळाडू सिद्धान्त थिंगलियाला सहावे स्थान मिळाले. त्याने ही शर्यत १३.७३ सेकंदांत पार केले. या मोसमात त्याने १३.६५ सेकंद अशी स्वत:ची सर्वोत्तम वेळ नोंदविली होती, मात्र या कामगिरीइतकी कामगिरी त्याला येथे करता आली नाही.
महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत भारताच्या टिंटू लुका व सुषमा देवी यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवीत पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. प्राथमिक फेरीत अग्रस्थान घेताना टिंटू हिने २ मिनिटे ४.२८ सेकंद अशी वेळ नोंदविली. दोन मिनिटे ०.५६ सेकंद अशी तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. सुषमाने ही शर्यत दोन मिनिटे ३.५४ सेकंदांत पार केली. चारशे मीटर अडथळा शर्यतीत गतवेळची विजेती अश्विनी आकुनजीने अंतिम फेरी निश्चित केली. तिने हे अंतर ५७.६७ सेकंदांत पूर्ण केले. या मोसमात ५६.१५ सेकंद अशी तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.
जोसेफ अब्राहमचे आव्हान संपुष्टात
पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत गतवेळचा सुवर्णपदक विजेता जोसेफ अब्राहमला प्राथमिक फेरीत हार मानावी लागली. ही शर्यत पार करण्यास त्याला एक मिनिट ५१.०४ सेकंद वेळ लागला. जितीन पॉलने या शर्यतीत भारताचे आव्हान राखले. त्याने हे अंतर २ मिनिटे ५१.७६ सेकंदांत पार केले. ८०० मीटर धावण्यामध्ये साजिश जोसेफने मात्र अंतिम फेरी निश्चित केली. त्याने ही शर्यत एक मिनीट ४९.९० सेकंदांत पूर्ण केली. महिलांच्या २०० मीटर शर्यतीत भारताच्या आशा रॉयचे आव्हान संपुष्टात आले. ही शर्यत पार करण्यास तिला २३.९६ सेकंद वेळ लागला.
रौप्यपदकोवरच समाधान
सलग तीन दिवस भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदकोचा आनंद लुटला असला तरी मंगळवारी मात्र एक रौप्य आणि एको कोंस्यपदकोवर समाधान मानावे लागले. थाळीफे कीत विकोस गौडाला रौप्यपदक पटकोवता आले, तर नौकोनयन प्रकोरामध्ये वर्षां गौतम आणि ऐश्वर्या नेडुचेझियान यांनी कोंस्यपदक पटकोवले. बॉक्सिंगमध्ये मेरी कोम आणि ८०० मीटर धावण्याच्या महिलांच्या शर्यतीत टिंटू लुकोने अंतिम फे री गाठली आहे. क बड्डीमध्ये पुरु ष आणि महिला दोन्ही संघांनी उपांत्य फे रीत दमदार मजल मारली आहे.