News Flash

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत विकास कृष्णनला जेतेपदाची खात्री

इंग्लंडमधील दोन आठवडय़ांच्या प्रशिक्षणानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या बॉक्सर विकास कृष्णनला आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाची अपेक्षा वाटत आहे.

| August 12, 2015 02:05 am

इंग्लंडमधील दोन आठवडय़ांच्या प्रशिक्षणानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या बॉक्सर विकास कृष्णनला आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाची अपेक्षा वाटत आहे. तो ७५ किलो गटात सराव करतो. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग हा ७५ किलो गटात भाग घेत होता. मात्र विजेंदर याने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या जागी विकासला संधी मिळणार आहे. विकासने गेल्या वर्षी कोरियात झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.  तो सध्या पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत सराव करीत आहे. त्याने २०१२ मध्ये लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये ६९ किलो गटांत भाग घेतला होता. त्या वेळी त्याने उपउपान्त्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2015 2:05 am

Web Title: vikas krishan confident to win gold in asian games boxing
Next Stories
1 मुंबई हॉकीचे भवितव्य आज ठरणार
2 विक्रमवीर काशी
3 उत्तेजक सेवनप्रकरणी २८ धावपटूंचे निलंबन
Just Now!
X