26 September 2020

News Flash

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : विकास कृष्णनला द्वितीय मानांकन

बँकॉक, थायलंड येथे आयोजित आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विकास कृष्णनला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.

| August 27, 2015 02:41 am

बँकॉक, थायलंड येथे आयोजित आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विकास कृष्णनला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेसाठी मानांकन मिळालेला तो एकमेव भारतीय बॉक्सिंगपटू आहे. विकास ७५ किलो वजनी गटातून खेळणार आहे. दरम्यान, शिवा थापासह सहा भारतीय बॉक्सिंगपटूंना पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे.
सलामीच्या दिवशी ६० किलो वजनी गटातून खेळणाऱ्या मनीष कौशिकने बांगलादेशच्या एम. होसेनचा ३-० असा धुव्वा उडवला. दुसऱ्या फेरीत त्याचा मुकाबला चीनच्या चिन लाँगशी होणार आहे. या स्पर्धेद्वारे ऑक्टोबर महिन्यात दोहा येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता होण्याची संधी बॉक्सिंगपटूंना मिळणार आहे.
एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो), मदन लाल (५२ किलो), मनोज कुमार (६४ किलो), कुलदीप सिंग (८१ किलो) यांच्यासह मनदीप जांगरा (६९ किलो) यांच्या लढती गुरुवारी होणार आहेत. मनदीपने व्हिएतनामच्या व्हिएन गॉक ह्य़ुन्हविरुद्धची लढत जिंकल्यास त्याच्यासमोर जपानच्या यासुहिरो सुझुकीचे आव्हान असणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या मनप्रीत सिंगची लढत श्रीलंकेच्या न्यूवान सुगीवाशी होणार आहे.  सतीश कुमारसमोर कोरियाच्या ह्य़ोक रि जीनचे आव्हान असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 2:41 am

Web Title: vikas krishnan seeded second in asian championships
Next Stories
1 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, सेरेना अग्रमानांकित
2 विश्व अजिंक्यपद : भारताचा वेटलिफ्टिंग संघ जाहीर
3 BLOG : विविधतेचे रूटीन झाले तर त्याचा आश्विन होतो!
Just Now!
X