News Flash

विनायक सामंत मुंबई रणजी संघाचे नवीन प्रशिक्षक

रमेश पोवारला मागे टाकत सामंत यांची बाजी

विनायक सामंत मुंबईच्या रणजी सामन्यात रोहित शर्मासोबत (संग्रहीत छायाचित्र)

मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी माजी यष्टीरक्षक फलंदाज विनायक सामंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनने विल्कीन मोटा यांची मुंबईच्या १९ वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. आगामी रणजी हंगामापर्यंत विनायक सामंत मुंबईचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर एमसीएचे सह सचिव उन्मेश खानविलकर यांनी सामंत व विल्कीन मोटा यांच्या नेमणूकीबद्दलची घोषणा केली आहे.

माजी प्रशिक्षक समीर दिघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जागा रिक्त होती. विनायक सामंत यांनी राजस्थानचे माजी खेळाडू प्रदीप सुंदरम आणि मुंबईचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांच्यावर मात करत मानाचं प्रशिक्षकपद मिळवलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाचा मोठा दबदबा आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेचं सर्वाधीक वेळा विजेतेपद मुंबईने पटकावलं आहे.

४६ वर्षीय विनायक सामंत यांनी मुंबईकडून १०१ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये सामंत यांनी ३ हजार ४९६ धावा केल्या असून नाबाद २०० ही सामंत यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. सामंत यांनी मुंबईसोबत त्रिपुराचंही प्रतिनिधीत्व केलं आहे. मध्यंतरीच्या काळात मुंबईचं प्रशिक्षकपद रमेश पोवार याच्याकडे जाईल असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र एमसीएच्या बैठकीत ज्यांनी एमसीएने दिलेली जबाबदारी सोडली असेल त्यांचा कोणत्याही मुख्य जबाबदारीसाठी विचार केला जाणार नसल्याचं ठरलं. याकारणासाठी पोवार याच्याजागी सामंत यांची निवड करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 12:06 pm

Web Title: vinayak samant appointed as new mumbai ranji team coach
टॅग : Mca
Next Stories
1 रोनाल्डोविरोधात कामगार संपावर जाणार
2 सुवर्णकन्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव, ट्विटरवरुन दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा
3 IAAF World U20 Championship : धावपटू हिमा दासने रचला इतिहास, भारताला पहिल्यांदाच जिंकून दिले सुवर्ण
Just Now!
X