News Flash

आयपीएल स्पॉट फिक्सिंग: विंदूने केला होता अॅडम गिलख्रिस्ट, मनप्रित गोनीशी मैत्रीचा प्रयत्न

आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावरून अटकेत असलेला अभिनेता विंदु दारा सिंह याने मॅच फिक्सिंगच्या हेतूने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट आणि गोलंदाज मनप्रित सिंग

| June 1, 2013 12:05 pm

आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावरून अटकेत असलेला अभिनेता विंदू दारा सिंह याने मॅच फिक्सिंगच्या हेतूने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट आणि गोलंदाज मनप्रित सिंग यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता असे मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या सुत्रांनी सांगितले. तसेच विंदू १९९० सालापासून क्रिकेटवर सट्टेबाजी करत असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, विंदू नेहमी खेळाडू, पंच आणि संघाच्या सुत्रांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असे आणि सट्टेबाजीला मदत होईल या दृष्टिकोनातून संघाची काही गुप्त माहीती काढून घेण्याचा त्याचा मानस असे.
“काही महिन्यांपूर्वी विंदूने मुंबईत एका इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या प्रमोशनल कार्यक्रमासाठी , अॅडम गिलख्रिस्ट आणि मनप्रितला निमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न विंदु केला होता. मात्र, गिलख्रिस्ट आणि मनप्रितने त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिले नव्हते.” असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2013 12:05 pm

Web Title: vindoo tried to befriend adam gilchrist manpreet gony
Next Stories
1 खेळ म्हणून तिरंदाजीची ओळखच नाही -दीपिका
2 नदाल, फेडरर, सेरेना शारापोव्हा सुसाट!
3 बीसीसीआयचे पदाधिकारी शिर्के, जगदाळे यांचे राजीनामे
Just Now!
X