28 September 2020

News Flash

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला करोनाची लागण

विनेशची यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी निवड

भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी विनेश फोगाटला करोनाची लागण झाली आहे. कुस्तीपटू विनेशची यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. विनेश सध्या आपले प्रशिक्षक ओम प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेपत येथे सराव करत होती. पण आपला करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर विनेशने तात्काळ स्वतःला क्वारंटाइन केलं आहे. ट्विटर अकाऊंटवर विनेशने आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

विनेशचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला असला तरी तिच्यात सध्या करोनाची कोणतीही लक्षणं आढळत नाहीयेत. या कारणामुळे विनेशने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण समारंभात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन पश्चात कुस्ती महासंघाने आपल्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय कँपची घोषणा केली होती. परंतू कँपमधील व्यवस्थेवर बोट ठेवत विनेशने घरीच सराव करणं पसंत केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 10:27 am

Web Title: vinesh phogat tests positive for covid 19 says she is asymptomatic psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 National Sports Day : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्याविषयी १० महत्वाच्या गोष्टी
2 टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन धोक्यात
3 राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला १४ विजेते अनुपस्थित
Just Now!
X