Rome Ranking series स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने धडाकेबाज कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ५३ किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरीत इक्वेडोरच्या लुसिया एलिजाबेथ मेलेंड्रेसचा ४-० ने पराभव केला. नवीन वर्षातलं विनेशचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. तर दुसरीकडे ५७ किलो वजनी गटात भारताची युवा कुस्तीपटू अंशु मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

अंतिम फेरीत विनेशला फारशी कडवी टक्कर मिळाली नसली, तरीही अंतिम फेरीपर्यंत पोहचण्याचा तिचा रस्ता खडतर होता. प्राथमिक फेऱ्यांमध्ये विनेशने दोन चिनी प्रतिस्पर्ध्यांचं कडवं आव्हान मोडीत काढलं होतं. मात्र यानंतर विनेशने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संधीच दिली नाही. युक्रेनच्या ख्रिस्टीना ब्रिझा आणि चीनच्या लानून लिओवर विनेशने अनुक्रमे १०-० आणि १५-५ अशी मात केली. या दोन्ही सामन्यांत विनेशने आपल्या खास डावपेचांवर भर देत, प्रतिस्पर्धी खेळाडूला नामोहरम केलं. मात्र अंतिम फेरीत विनेशला फारशी टक्कर मिळाली नाही.

Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
Chennai Super Kings vs Mumbai Indians Highlights in Marathi
IPL 2024 CSK vs MI: चेन्नईचा मुंबईवर २० धावांनी दणदणीत विजय, रोहित शर्माची शतकी खेळी ठरली व्यर्थ
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद