भारतीय कुस्तीला वेगळी ओळख निर्माण करुन देणाऱ्या फोगट भगिनींनी भारताची मान उंचावण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. स्पेनच्या माद्रिद शहरात शहरात झालेल्या स्पॅनिश ग्रँड पिक्स कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटने ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. २४ वर्षीय विनेश फोगटने कॅनडाच्या नताशा फॉक्सचा अंतिम फेरीत १०-० च्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे.

पात्रता फेरीपासून विनेशने आपल्या आक्रमक कुस्तीचा धडाका सुरुच ठेवला होता. पात्रता फेरीच्या सामन्यात विनेशने मेक्सिकोच्या मरियाना डाएझवर १०-० असं निर्विवाद वर्चस्व मिलवलं. तर अमेरिकेच्या एरिन गोलस्टनवर विनेशने १२-१ अशी मात केली. उपांत्यपूर्वी फेरीत विनेशने रशियाच्या वलेरिया चेप्साराकोव्हावर मात करुन उपांत्य फेरीत गाठली. यानंतर प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला चीतपट करत विनेशने भारताला अंतिम फेरीत सुवर्णपदकाची कमाई करुन दिली.