सलामीचा फलंदाज विराग आवटे याने पदार्पणातच केलेल्या नाबाद शतकासह महाराष्ट्राने विदर्भविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात ३ बाद २२७ अशी शानदार सलामी केली.
महाराष्ट्राने सलामीवीर हर्षद खडीवाले (तीन चौकारांसह २६ धावा) याची विकेट लवकर गमावली. मात्र आवटे याने संग्राम अतितकर याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ३६ षटकात ९४ धावांची भागीदारी केली तर कर्णधार रोहित मोटवानी याच्या साथीत त्याने चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची अखंडित भागीदारी रचली. त्यामुळेच महाराष्ट्राचा डाव सावरला गेला. आवटे याने केलेल्या नाबाद १११ धावा हेच महाराष्ट्राच्या पहिल्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. त्याने ३०२ चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार मारले. अतितकर याने तीन चौकार व दोन षटकारांसह ४५ धावा केल्या. मोटवानी याने दोन चौकारांसह नाबाद २४ धावा केल्या. विदर्भ संघाकडून साईराज बहुतुले याने ५५ धावांमध्ये दोन गडी बाद केले.
 संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद २२७ (विराग आवटे खेळत आहे १११, हर्षद खडीवाले २६, संग्राम अतितकर ४५, रोहित मोटवानी खेळत आहे २४ साईराज बहुतुले; २/५५).

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore Match Updates in marathi
RR vs RCB : विराट कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, आयपीएलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला संयुक्त पहिला खेळाडू
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’