News Flash

Video : नाचोsss ….. क्रिकेटपटूने रस्त्यावरच सुरू केला डान्स

संघातील दुसऱ्या खेळाडूने शेअर केला व्हिडीओ

पाकिस्तानचा युवा खेळाडू हसन अली थेट रस्त्यावरच नाचत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानचा सहकारी खेळाडू क्रिकेटपटू आसिफ अलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. हा व्हिडिओमध्ये नक्की केव्हाचा आहे ते समजू शकलेले नाही. पण सध्या पाकिस्तानात लॉकडाउन सुरू आहे. आणि व्हिडीओमध्ये आजूबाजूला अनेक लोक दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ लॉकडाउनच्या आधीच्या असल्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

Veera 1 ware fer

A post shared by Asif Ali (@asif9741) on

गोलंदाजी करताना गडी बाद केल्यावर त्याचं सेलिब्रेशन करणाऱ्या पद्धतीमुळे हसन क्रिकेट वर्तुळात ओळखला जातो. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्याच्या डान्समुळेही तो काही वेळा चर्चेत असतो. त्याच्या एक चांगला डान्सर दडलेला आहे. हसन अली सध्या पाठीच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. त्यासाठी तो ऑस्ट्रेलियात जाणे अपेक्षित होते, पण लॉकडाउनमुळे तो अद्यापही पाकिस्तानातच असल्याचे सांगितले जात आहे. अली या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळल्यानंतर पाठीच्या समस्येने पीडित होता. करोना व्हायरसमुळे मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीमुळे त्याला पुन्हा बरे होण्यास वेळ मिळाला आहे, पण आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला पाकिस्तानच्या २९ सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर याचा अंदाज शकतो.

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हसन अलीने ५ सामन्यांत १३ बळी घेतले होते. पण २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला चार सामन्यांत केवळ २ गडी बाद करता आले. त्यानंतर त्याला अंतिम ११ मधून वगळण्यात आले. जानेवारी २०१९ नंतर हसन अली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं त्याला वार्षिक करारातूनही वगळले. २०१६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ५३ वन डे सामन्यांत ८२ बळी, नऊ कसोटी सामन्यांत ३१ बळी आणि ३० टी-२० सामन्यांत ३५ बळी टिपले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 4:05 pm

Web Title: viral video pakistan pacer hasan ali dancing on streets with musicians vjb 91
Next Stories
1 संधी मिळाल्यास भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायला आवडेल – मोहम्मद अझरुद्दीन
2 ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या अलिबागकरांना पृथ्वीची मदत
3 Flashback : टीम इंडिया – १७/५… मग कपिल देवने ठोकल्या नाबाद १७५ धावा
Just Now!
X