News Flash

विराट हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज : रवी शास्त्री

विराटबाबत लिखाण करण्यासाठी पत्रकारांनाही नवीन शब्द शोधावे लागतील.

| February 19, 2018 03:43 pm

संग्रहित छायाचित्र

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कमालीचे सातत्य पाहता भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याचा जगातील सवरेत्कृष्ट फलंदाज असल्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. कोहलीवर स्तुतिसुमने उधळतानाच त्यांनी त्याच्यासह इंग्लंडचा ज्यो रूट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टीव्हन स्मिथ यांना जगातील अव्वल चार फलंदाजांमध्ये स्थान दिले आहे.

‘‘विराटची फलंदाजीतील सरासरी उल्लेखनीय आहे. मात्र त्यापेक्षाही त्याने ज्या प्रकारे धावा केल्या आहेत आणि सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी झालेला त्यांचा परिणामही तितकाच प्रशंसनीय आहे. विराटची फलंदाजी पाहता तो सध्याचा सवरेत्कृष्ट फलंदाज आहे, यात शंका नाही,’’ असे शास्त्री म्हणाले.

द. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने धडाकेबाज खेळ करताना ६ सामन्यांत ३ शतकांसह ५५८ धावा फटकावल्या आहेत.  शास्त्री यांनी विराटच्या नेतृत्व गुणांचेही कौतुक केले आहे. ते म्हणाले,  ‘‘कसोटी मालिकेतील ०-२ अशा पिछाडीनंतर जोहान्सबर्गमध्ये झालेली तिसरी आणि अंतिम कसोटी जिंकून आम्ही पुनरागमन केले. त्यानंतर भारताने वळून पाहिलेले नाही. कोहलीने फलंदाजीची धुरा सांभाळतानाच सर्व सहकाऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यात मोलाचे योगदान दिले.’’

कौतुकासाठी नव्या शब्दकोशाची गरज

‘‘विराटच्या कौतुकासाठी सगळी विशेषणे कमी पडत आहेत. त्याच्या कौतुकासाठी मला ऑक्सफर्डचा नवा शब्दकोश घ्यावा लागेल. विराटबाबत लिखाण करण्यासाठी पत्रकारांनाही नवीन शब्द शोधावे लागतील. तुमच्या जागी मी असतो तर नवा शब्दकोश विकत घेतला असता,’’ असे शास्त्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 2:06 am

Web Title: virat is the best batsman of the world says ravi shastri
Next Stories
1 भारतीय महिलांचे लक्ष्य विजयी आघाडीचे
2 अडचणींवर मात करत हनीयूचे दुसरे सुवर्ण
3 माझ्या यशाचे सगळे श्रेय अनुष्काला-विराट कोहली
Just Now!
X