भारतीय कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार एम.एस. धोनीचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीनं टी २० मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा काढण्याचा धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय कर्णधार म्हणून टी २० मध्ये सर्वाधिक धावा आता विराट कोहलीच्या नावावर आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडबरोबर सुरू असेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने २५ धावा करताच टी २० मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम केला. विराट कोहलीने न्यूझीलंडबरोबर ३८ धावांची खेळी केली. टी २० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर ११२६ धावा झाल्या आहेत. धोनीनं टी २० कर्णधार असताना एक हजार ११२ धावा काढल्या होत्या.

टी २० मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून फाफ डु प्लेसिसच्या खात्यात १ हजार २७३ धावा आहेत. १ हजार १४८ धावांसह दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सन आहे. विराट कोहली ११२६ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

आणखी वाचा : मुंबईकर रोहित शर्मानं केला मोठा विक्रम 

दरम्यान, सलामी फलंदाज रोहित शर्माचे अर्धशतक (६५) आणि कर्णधार विराट कोहली (३८) यांच्या खेळीच्या बळावर भारताने निर्धारित २० षटकांत पाच बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडला विजयासाठी १८० धावांचे आव्हान देण्यात आलं आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताने बाजी मारत पाच सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामना जिंकून इतिहास रचण्याच्या इराद्याने भारतीय संघ खेळत आहे.