News Flash

Video: अन् विराट कोहलीवरचे संकट टळले!

चमक आणण्यासाठी चेंडूसोबत छेडछाड करणे आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन समजले जाते.

विराट कोहली

भारतीय कसोटी संघाचा कर्णार विराट कोहलीवर चेंडूशी छेडछाड केल्याची टांगती तलवार  निर्माण झाली होती. पण इंग्लंड संघाने विराटवर कोणताही आरोप केला नसल्यामुळे विराटवरील आरोप आयसीसीने फेटाळले आहेत. भारताच्या दौऱ्यावर असणाऱ्या इंग्लडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली मैदानावर चेंडूशी छेडाछाड केली असा आरोप इंग्लडमधील एका वृत्तपत्राने केला होता. इंग्लडच्या प्रसारमाध्यमांनी केलेला आरोपामुळे विराटवर कारवाई करता येत नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. इंग्लडमधील एका वृत्तपत्राने राजकोटच्या मैदानात विराट कोहलीने चेंडूशी छेडछाड करताना दिसत असल्याचा दावा केला होता. दक्षिण आफ्रिकेतील एका वृत्तसमूहाने विराट कोहली चेंडूशी छेडछाड करत असल्याचे भासत असतानाचा एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला होता.

वृत्तपत्राने दावा केला होता की, विराट कोहली या व्हिडिओमध्ये  हात तोंडात घालून त्यानंतर चेंडूला चमक आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. इंग्लड संघाने कोहलीच्या या कृतीबद्दल कोणतीही तक्रार केली नव्हती. तसेच या वृत्तानंतर प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला होता. आतंरराष्ट्रीय नियमानुसार चेंडूशी छेडछाड करत असल्याचा आरोप हा विरोधी संघ किंवा त्या संघातील खेळाडूने करणे अपेक्षित असते. कसोटी सामना संपल्यानंतर पाच दिवसांच्या आत अशी तक्रार नोंदविल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ याबाबत विचार करत असते.

भारत आणि इंग्लंड यांच्या ९ नोव्हेंबरला पहिली कसोटी राजकोटच्या मैदानात खेळवली गेली. १३ नोव्हेबरला संपलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यानंतर इंग्लडने विराटविरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती. त्यामुळे नियमानुसार विराटवर चेंडूसोबत छेडछाडीमध्ये दोषी ठरु शकत नाही. पहिला कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या पाहुण्या इंग्लंडला  भारतीय संघाने विशाखापट्टणमच्या मैदानात पराभूत करुन मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

सचिन-द्रविडसह हे क्रिकेटर चेंडूशी छेडछाड केल्यामुळे चर्चेत आले होते!

कोहलीवर छेडछाडीचा आरोप निराधार सिद्ध झाला असला तरी, क्रिकेटच्या मैदानात मंगळवारी आफ्रिकेच्या खेळाडूला चेंडू छेडखानी प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. तीन वर्षांमध्ये दुसऱ्यांदा फॅफ ड्युप्लेसिस अशा प्रकारे दोषी आढळला आहे. मात्र तरीही फॅफ ड्युप्लेसिस ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दिवस-रात्र चालणाऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार आहे. ऍडलेड ओव्हलवर तीन तास चाललेल्या सुनावणीनंतर आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी चेंडूशी केलेल्या छेडछाड प्रकरणात ड्युप्लेसिस दोषी असल्याचे म्हटले. यानंतर ड्युप्लेसिसच्या सामन्याच्या मानधनातील १०० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली. आयसीसीच्या आचारसंहितेच्या अंतर्गत ड्युप्लेसिसवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मैदानात चेंडूला चमक आणण्यासाठी चेंडूसोबत छेडछाड केल्याचे प्रकार दिसून येतात. असा प्रकारात दोष आढल्यास आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मानधनामध्ये कपात किंवा सामन्यावर बंदी घालण्याचे आयसीसीला अधिकार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 10:54 pm

Web Title: virat kohli accused of ball tampering icc rejects probe watch video
Next Stories
1 इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, गंभीरला डच्चू, भुवनेश्वरचे पुनरागमन
2 चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी फॅफ ड्युप्लेसिस दोषी
3 सातव्या डावातही बरोबरी
Just Now!
X