News Flash

Video : कहानी में ट्विस्ट! हार्दिकच्या ‘फ्लाईंग पुश-अप्स’ला विराटचं झकास उत्तर

पाहा 'कॅप्टन कोहली'चा खास व्हिडीओ

बॉलिवूड आणि क्रिकेट हे समीकरण भारतासाठी काही नवीन नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना साऱ्यांच्या नजरा याच जोडीवर होत्या. त्यांच्या लग्नानंतर आता चाहत्यांना गॉसिपसाठी एक नवी जोडी मिळाली आहे. ती म्हणजे हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविच. काही दिवसांपूर्वी हार्दिकने त्याची गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची गोड बातमी दिली. त्या बातमीनंतर पुन्हा एकदा हे दोघे चर्चेत आले होते.

हार्दिक पांड्या हा आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचा आहे. तो बऱ्याचदा आपले जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. या वेळी हार्दिकने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो उड्या मारत पुश-अप्स करताना दिसला. साहजिकच या अनोख्या पुश-अप्सची चाहत्यांना भुरळ पडली. केवळ चाहतेच नव्हे, तर बॉलिवूड अभिनेत्री आणि महिला क्रीडापटूही या पुश-अप्सवर फिदा झाल्याचे दिसून आले.

हार्दिकने पोस्ट केलेला व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

Stronger. Fitter. Still under construction @krunalpandya_official, I challenge you bhai! Let’s see how many you can do #PandyaBrothers

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिकच्या या व्हिडीओला कॅप्टन कोहलीने दमदार उत्तर दिलं. त्याने ‘फ्लाईंग पुश-अप्स’मध्ये थोडा ट्विस्ट करत नवा प्रकार शोधला. पुश-अप्स मारताना उड्या तर त्याने मारल्याच, पण त्यासह त्याने हवेत असताना टाळ्याही वाजवून दाखवल्या. या नव्या ट्विस्टवर चाहते भलतेच खुश झाले.

विराटने आणला ट्विस्ट –

 

View this post on Instagram

 

Hey H @hardikpandya93 loved your fly push ups. Here’s adding a little clap to it .

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

हार्दिक मात्र या पुश-अप्सला कसं उत्तर देतो? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 7:05 pm

Web Title: virat kohli adds a twist to hardik pandya fly push ups see video vjb 91
Next Stories
1 आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर ! बीसीसीआय अधिकाऱ्याची माहिती
2 शशांक मनोहर भारत विरोधी काम करत होते, एन.श्रीनिवासन यांचा हल्लाबोल
3 एकाच सामन्यात खेळणार तीन संघ; ‘या’ तारखेला रंगणार आगळंवेगळं क्रिकेट
Just Now!
X