News Flash

ये नया इंडिया है ! पहिल्या कसोटीआधी आक्रमक शैलीबद्दल विराटचं वक्तव्य

आक्रमक क्रिकेट खेळण्याचा भारताचा प्रयत्न !

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला विराटचा हा अखेरचा सामना असून या सामन्यानंतर तो भारतात परतणार आहे. मैदानात नेहमी आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणाऱ्या विराटला पहिल्या कसोटी सामन्याआधी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलत असताना विराटने मी नवीन भारताचं प्रतिनिधीत्व करतो असं म्हटलं आहे.

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी काही दिवसांपूर्वी विराटच्या फलंदाजीचं कौतुक करताना त्याच्यात आॉस्ट्रेलियन खेळाडूंसारखा आक्रमकपणा दिसतो असं म्हटलं होतं. भारताचे इतर खेळाडू हे तुलनेने शांत असतात असंही चॅपल म्हणाले होते. याला उत्तर देताना विराटने, “मला सांगायला आवडेल की मी कधीही स्वतःला बदलायला जात नाही. माझा स्वभाव, शैली अशीच आहे. मी नव्या भारताचं प्रतिनिधीत्व करतो”, असं उत्तर दिलं.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू किंवा त्यांच्या शैलीशी माझी तुलना करणं इतक महत्वाचं नाही. परंतु पहिल्या दिवसापासून आम्ही अशाच पद्धतीने आक्रमक क्रिकेट खेळत आहोत. नवीन भारतीय संघ हा कोणतही आव्हान स्विकारतून ते तितक्याच सकारात्मक उर्जेने पूर्ण करण्याची तयारी ठेवतो, विराट स्वतःची तुलना ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या शैलीशी होण्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 9:05 am

Web Title: virat kohli ahead of test series opener i am the representation of new india psd 91
Next Stories
1 राजीव शुक्लांकडे BCCI चं उपाध्यक्षपद जाण्याचे संकेत
2 Video: बाबोsss…. एकाच ओव्हरमध्ये घेतले ५ बळी
3 विभाजित कर्णधारपद भारतीय क्रिकेटसाठी धोकादायक!
Just Now!
X