02 March 2021

News Flash

‘विरुष्का’च्या या फोटोने ट्विटरवर घातला धुमाकूळ, मोडले सर्व विक्रम

तुम्ही पाहिलात का फोटो?

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल सतत कणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी जोडी आहे. त्यांच्या क्षेत्रात दोघेही सर्वोच्च स्थानावर आहेत. विरुष्का नावानं या दाम्पत्याला ओळखलं जातं. सोशल मीडियावर दोघांच्या नावाच्या चर्चा असतात. या लव्ह बर्डचा खास फोटो सध्या ट्विटरवर चर्चेत विषय आहे. विरुष्काचा हा फोटो ट्विटरवर २०२० या वर्षात सर्वाधिक लाइक मिळालेला फोटो ठरला आहे.

आयपीएलपूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीनं आपल्या चाहत्यांसोबत वडिल होणार असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली होती. ही बातमी देताना कोहलीनं पत्नी अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. नेटकऱ्यांनी या फोटोला पसंती दिली. या वर्षात ट्विटरवर सर्वाधिक लाइक मिळालेला फोटो ठरला आहे. “जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार”, असं कॅप्शन विराट कोहलीनं त्या खास फोटोला दिलं होतं.

The most Liked Tweet of 2020
2020 का सबसे ज्यादा लाइक किया गया ट्वीट
2020ம் ஆண்டின்அதிகம் லைக் செய்யப்பட்ட டுவீட் pic.twitter.com/lMN18Z5KEd

— Twitter India (@TwitterIndia) December 8, 2020

ट्विटर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या या फोटो ६.२७ लाख लोकांनी लाइक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 2:53 pm

Web Title: virat kohli and anushka sharmas pregnancy announcement becomes the most liked tweet of 2020 nck 90
Next Stories
1 …म्हणून जाडेजाऐवजी चहलला संधी देण्यात आली ! जाणून घ्या पडद्यामागे नेमकं काय घडलं??
2 शामी बाहेर, नटराजनला संधी; सेहवागनं निवडले विश्वचषकासाठी गोलंदाज
3 Ind vs Aus : कोहलीची ‘विराट’ खेळी निष्फळ, अखेरच्या टी-२० मध्ये कांगारुंची बाजी
Just Now!
X