वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होईल. दोन्ही संघांमधील सामना १८ जूनपासून साऊदम्पटन येथे सुरू होईल. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ बुधवारी युकेला रवाना झाला. दरम्यान, जाण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्हर्च्युअल परिषदेत भाग घेतला आणि विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

परिषद दरम्यान एक घटना घडली, ज्यामुळे सोशल मीडीयावर जोरदार चर्चा होत आहे. कोहली आणि शास्त्री दोघांनाही आपण लाईव्ह असल्याचे कळले नाही. हे दोघे न्यूझीलंडविरुद्धच्या त्यांच्या खेळाच्या योजनेविषयी चर्चा करीत होते. काही वेळातच कोहली-शास्त्री यांच्या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाजीचे आक्रमण कशे राहील, असा अंदाज लावल्या जात होता.

ऑडिओमध्ये विराट कोहली म्हणाला,”डावखुरे फलंदाज असल्यामुळे आपण यांना राऊंड द विकेट गोलंदाजी करू. लाला सिराज सुरुवातीपासूनच सर्वांना लावून देऊ” यावर शास्त्री म्हणाले, हम्‍म”

कोहली आणि शास्त्री यांच्यातील संभाषणातून हे समजले जाऊ शकते की मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी (लाला) दोघांनाही न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ११ मध्ये संधी मिळू शकते. मात्र, सामन्यापूर्वी भारताची प्लेइंग इलेव्हन निश्चित होईल.

सर्वोत्तम तीन सामन्यांद्वारे विजेता ठरवावा – शास्त्री

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता एका सामन्याद्वारे न ठरवता सर्वोत्तम तीन लढतींच्या पद्धतीद्वारे (बेस्ट ऑफ थ्री फायनल्स) विजेत्याची निवड करावी, असे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सुचवले आहे.

हेही वाचा – क्रिकेटच्या पंढरीत न्यूझीलंडच्या फलंदाजाचं शतक, पण चर्चा गांगुलीची!

भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साऊदम्पटन येथे पहिल्यावहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. यासाठी बुधवारी भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना झाला. त्यावेळी शास्त्री यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील हंगामांत कोणते बदल असावेत, याविषयी भाष्य केले.