भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याला सुरुवात होण्याआधी, एका विशेष व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. बीसीसीआयचे मुख्य क्युरेटर दलजित सिंह यांचा क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मानचिन्ह देत सत्कार केला.

गेली ८० वर्ष दलजित सिंह क्रिकेटची सेवा करत आहेत. बीसीसीआयने या छोटेखानी सत्कारसोहळ्याचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी दलजित सिंह यांनी यष्टीरक्षक या नात्याने क्रिकेक कारकिर्दीची सुरुवात केली. यष्टीरक्षक म्हणून दलजित सिंह यांनी ८७ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ७ शतकं आणि १९ अर्धशतकांसह ३९६४ धावा काढल्या आहेत. याचसोबत यष्ट्यांमागे दलजित यांच्या नावावर २२५ बळी जमा आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर दलजित गेली २२ वर्ष क्युरेटर म्हणून काम पाहत आहेत.