सलामीवीर मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या वन-डे सामन्यातही बाजी मारली आहे. भारताने विजयासाठी दिेलेलं २९७ धावांचं आव्हान न्यूझीलंडने ५ गडी राखत पूर्ण केलं. या विजयासह न्यूझीलंडने वन-डे मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला असून, टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

अवश्य वाचा – प्रत्येक सामना जिंकू शकत नाही, पराभवाचा इतका विचार करु नका – चहल

या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. रोहित शर्माही या मालिकेत दुखापतीमुळे खेळू शकला नाही. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत विराट एकही शतक झळकावू शकला नाही, असं झालं असलं तरीही विराट आणि रोहितचं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राहिलेलं आहे.

दरम्यान या मालिकेत आश्वासक फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या रॉस टेलरच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली आहे. तो पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आला आहे. तर दुखापतीमुळे पहिल्या दोन वन-डे सामन्यांत न खेळू शकणाऱ्या केन विल्यमसनच्या स्थानातही घसरण झालेली आहे. वन-डे मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

अवश्य वाचा – BLOG : या पराभवाची संघाला गरज होती !