नॉटींगहॅमच्या मैदानात भारताने इंग्लंडचा २०३ धावांनी पराभव करत ५ सामन्यांच्या मालिकेत दमदार पुनरागमन केलं आहे. या विजयासह भारताने आपली पिछाडी २-१ अशी कमी केली आहे. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने, आपला विजय हा केरळमधील पूरामध्ये आपले प्राण गमावणाऱ्या लोकांना समर्पित केला आहे. याचसोबत सर्व खेळाडू एका सामन्याचं मानधन हे मदतनिधीला देणार आहेत. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने यासंदर्भात घोषणा केली.

अवश्य वाचा – Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या विजयासाठी हे आहेत भारताचे ५ शिल्पकार

तिसऱ्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये विराटने सर्वोत्तम फलंदाजी केली. या कामगिरीसाठी सामनावीराच्या किताबाने विराटला गौरवण्यात आलं. दुसरीकडे गोलंदाजीत हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनीही भेदक मारा केला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत सध्या इंग्लंड २-१ ने आघाडीवर असून उरलेल्या दोन सामन्यांमध्ये कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.