News Flash

सोशल मीडियावर पुन्हा विरुष्काचे वारे

शास्त्रींसोबत तो, ती आणि ते...

विराट, अनुष्का आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा श्रीलंकन चाहत्यांसोबतचा फोटो

श्रीलंकेमध्ये झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का श्रीलंकन दौऱ्यावर देखील विराटसोबत दिसली. कसोटी मालिकेतील विजयानंतर कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री देखील दिसत आहेत.

कसोटी सामना जिंकल्यानंतर मंगळवारी विराट आणि अनुष्काने श्रीलंकन चाहत्यांसोबत एक फोटो काढला. विराट कोहली फॅन क्लबच्या इन्स्टाग्रामवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आलाय. याशिवाय आणखी एका फॅन क्लब अकाऊंटवर देखील  हा फोटो पोस्ट करण्यात आलाय. यामध्ये विराट, अनुष्का आणि प्रशिक्षक रवी शास्त्री श्रीलंकन चाहत्यांसोबत, असे कॅप्शन देण्यात आले असून या फोटोला ‘विरुष्का’ असा हॅशटॅग दिला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची क्रिकेट मालिका अथवा एखाद्या सामन्यानंतर भेट होणे तशी नवी गोष्ट नाही. दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या जशा अनेकदा चर्चा रंगल्या अगदी तशाच त्यांच्या भेटीच्या चर्चाही अनेकदा रंगल्याचे पाहायला मिळाले. अनुष्का शर्मा क्रिकेट सामन्यादरम्यान विराटसोबत दिसण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्यावेळी इंग्लंडमध्ये अनुष्का आणि विराट एकत्र दिसले होते. अनुष्काच नेहमी विराटसोबत दौऱ्यावर येते असे नाही. तर अनुष्कासाठी देखील विराट सातासमुद्रापलिकडे गेल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने अनुष्कासाठी अमेरिकेत रंगलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी विराट आणि अनुष्का या दोघांनी अमेरीकेतील न्यूयॉर्कमध्ये सोबत वेळ घालवला. दोघांच्या अमेरिकेतील भेटीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 11:29 am

Web Title: virat kohli anushka sharma and ravi shastri spotted with sri lankan fans
Next Stories
1 भारतीय क्रिकेट संघाकडून श्रीलंकेत स्वातंत्र्यदिन साजरा
2 धोनीबाबतच्या वक्तव्यावरून एमएसके प्रसाद टीकेचे धनी
3 नेदरलँड्सला नमवून भारताचा मालिकाविजय
Just Now!
X