28 November 2020

News Flash

‘विरूष्का’च्या बाळाला जन्माआधीच ऑस्ट्रेलियन नागरिकत्वाची ऑफर

विराट पालकत्व रजा घेऊन पहिल्या कसोटीनंतर भारतात परतणार

भारतीय संघाचा २७ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे. २७ तारखेला वन डे मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर टी२० मालिका खेळवण्यात येणार आहे. तर दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी झाल्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. जानेवारीमध्ये अनुष्का-विराटला अपत्यप्राप्ती होणार असल्याने तो डिसेंबरअखेरीसच ऑस्ट्रेलियातून प्रयाण करणार आहे. याचदरम्यान विरूष्काच्या बाळाला जन्माआधीच ऑस्ट्रेलियन नागरिकत्वाची ऑफर देण्यात आली आहे.

“विराट कोहली हा खूप आक्रमक क्रिकेटपटू आहे. मैदानावर त्याचा वावरही तसाच असतो. सध्या कोहलीसारखे दिग्गज खेळाडू आणि भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारखे बडे संघ यांच्यात हातात कसोटी क्रिकेटचं भवितव्य आहे. विराट कसोटी मालिकेतून मध्येच माघार घेऊन जाणार असल्याचं मला समजलं. आम्ही असा अंदाज बांधला होता की त्याचं बाळ हे ऑस्ट्रेलियात जन्माला येईल आणि मग आम्ही त्या बाळाला नागरिकत्व देऊन थेट ऑस्ट्रेलियन असल्याचा दावा करू”, असं मजेशीर मत बॉर्डर यांनी व्यक्त केलं.

टी२० विश्वचषक स्पर्धा रद्द करून त्याजागी IPLचे आयोजन करण्यात आले. या मुद्द्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “मला हा निर्णय फारसा पटला नाही. क्रिकेट समितीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य द्यायला हवं होतं. जर विश्वचषक स्पर्धा भरवणं शक्य नव्हतं, तर IPL च्या आयोजनाला परवानगी नाकारली जायला हवी होती. ही केवळ आर्थिक तडजोड होती असं मला वाटतं”, असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:50 pm

Web Title: virat kohli anushka sharma baby australian citizenship offer by former captain alan border ind vs aus vjb 91
Next Stories
1 सूर्यकुमारने ‘टीम इंडिया’त संधी न मिळण्याच्या मुद्द्यावर अखेर सोडलं मौन, म्हणाला…
2 गोलंदाजांची कामगिरी निर्णायक!
3 नदाल, जोकोव्हिच उपांत्य फेरीत
Just Now!
X